लता मंगेशकर यांची अटलजींना अनोखी श्रद्धांजली

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान आणि भारतरत्न प्राप्त अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर शुक्रवारी दिल्ली येथील स्मृतिस्थळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबासमवेत राजकिय नेत्यांसह त्यांचे चाहते मोठया संख्येने उपस्थित होते. याशिवाय अनेकांनी त्यांच्या कविता सोशल मिडीयावर पोस्ट केल्या. तसेच लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातील अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ट्‌विटर पोस्ट करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.

गुरूवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती खाल्यावल्याने अनेक जणांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. मात्र, सायंकाळी त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरात शोककला पसरली. बॉलीवूडमधील कलाकारांसह सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अनेक कलाकारांनी त्यांच्या सोबत व्यतीत केलेले प्रसंग शेअर केले. तर लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातील त्यांची “मौत से ठन गई’ ही कविता शेअर केली.

या कवितासह त्यांनी लिहिले आहे की, माझे दादा अटलजी एक साधुपुरूष होते. त्यांचे व्यक्‍तिमत्व हिमालयासारखे उंच आणि गंगा नदीसारखे पवित्र होते. मी जेव्हा त्यांच्या काही कविता रेकॉर्ड केल्या, तेव्हा या कविता अल्बममध्ये नव्हत्या. त्या कविता आज मी त्यांना अर्पण करत आहे, असे लिहिले आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत खूपच भावपूर्ण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)