लता मंगेशकर यांनी केली संजय लीला भंसाळीची स्तुती…

भारताची गायनसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनी संजय लीला भंसाळी यांच्या संगीताबाबत असलेल्या आत्मियतेबाबत स्तुती केली आहे. तसेच भंसाली यांची तुलना थेट राज कपूर यांच्याशी केली आहे. लतादीदींना त्यांच्या सर्व चित्रपटातील गाणे खूपच आवडतात. लता मंगेशकर म्हणाल्या की, मला आनंद होत आहे की ते स्वःता चित्रपटासाठी संगीत देत आहेत.

एका मुलाखतीत लतादीदींनी सांगितले की, भंसालीला संगीत आणि गाण्याची जान आहे आणि भारतीय सांस्कृतीक संगीतही त्यांना ज्ञात आहे. मला वाटते की त्यांच्या म्यूझिक सेंस राज कूपर यांच्यासारखा उत्तम आहे. राज कपूरही एक चांगले संगीतकार होते. ते तबला, हार्मेनियम आणि पियानो आदी वाद्यही वाजवत होते. तसेच ते गाणे कंपोज करून स्वःता गातही होते. त्यानंतरच ते गाणे कोणत्या प्लेबॅक गायकाकडे देत असत. असे असतानाही त्यांनी स्वःत कधीही त्याचे क्रेडिट घेतले नाही.

लता मंगेशकर यांनी आणखी एका चित्रपट निर्मात्याच्या म्यूझिक सेंसबाबत स्तूती केली. त्या म्हणाल्या की, राज कपूर प्रमाणेच राज खोसला यांनाही अनेक वाद्यांची जाण होती. ते मुंबईत गायक होण्यासाठीच आले होते. मात्र, ते चित्रपट निर्माते बनले. मला विश्‍वास आहे की, भंसाळीही उत्कृष्ट गायक आहेत. कोणत्याही चित्रपट निर्मित्याला गाण्यातील सूर समजण्यासाठी त्याला स्वःताला गाता येणे चांगली बाब असते, असे लतादीदींनी मुलाखतीत सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)