लता गवळी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

कर्जत – कर्जत तालुक्‍यातील माही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका लता गवळी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी सातारा जिल्ह्यातील वाई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

बंडगरवस्ती येथील विक्रम अडसूळ यांनाही नुकताच राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे या दोन्ही पुरस्कारांनी कर्जत तालुक्‍याच्या शैक्षणिक लौकिकात अधिकच भर पडलेली आहे. गवळी यांना यापूर्वी 2016 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डीएड केल्यानंतर गवळी यांनी आपले शिक्षण पुढे सुरूच ठेवले. इंग्रजी हा विषय घेऊन त्यांनी एमए तसेच एमएड केले. 2016 मध्ये त्यांची एमपीएससीतुन निवड झाली मात्र कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. इंग्रजी अध्यापनात त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थी घडवले आहेत. डीएड केल्यानंतर त्यांना शिक्षिकेची नोकरी लागली. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाहून घेतलेले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)