लढा कॅन्सर विरोधात 

डॉ. जतीन भाटिया 

कॅन्सर म्हटले की माणसाच्या मनात कमालीची भिती आणि मृत्युचे भय दाटून येत असते. काळजी घेणाऱ्या इतरांनाही त्याचा संसर्ग होईल अशी भीती वाटत असते. या आजाराती अनिश्‍चितता आणि अनाकलनीय असे या रोगाचे स्वरुप असल्याने दुर्दैवाने ही सारी कारणे खरी असल्यासारखी भासतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतिहास आपल्याला असे सांगतो, की कॅन्सर हा काही नवा प्रकार नाही. फार पूर्वीपासून हा आजार अस्तित्वात आहे. आता या आजाराविषयी जागरुकता वाढलेली आहे इतकेच. कॅन्सर या विषयाच्या अनेक व्याख्या सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. याचे मला जे काही आकलन झाले आहे त्यानुसार, आपल्या स्वत:च्या कृतींचाच परिणाम म्हणून आपल्या शरीराने केलेला तो विश्‍वासघात असतो. या साजया कृती बहुतांशवेळा पर्यावरणाशी संबंधीत असतात. (धूम्रपान, तंबाखू इत्यादी.), अन्नपदार्थ (जंक फूड, स्पाईसेस इत्यादी) आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी (अनुवंशिक).

यातील बहुतांश गोष्टी अशा असतात ज्या आपल्या नियंत्रणामध्ये येऊ शकतात काही आपल्या क्षमतांच्या पलिकडच्या असतात. यातील अधिक धोका असणाजया गटांचे वर्गीकरण करून आपण त्याच्याशी लढा देऊ शकतो आणि त्याला आपल्या निरीक्षणाखालीसुद्धा आणू शकतो. अर्थात हे शक्‍य आहे पूर्वनिदान आणि वेळेत योग्य उपचार सुरू झाले तरच. विज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आपल्या देशातसुद्धा अद्ययावत अशा स्वरुपाच्या उपचारपद्धती आता अस्तित्वात आल्या असून जगाच्या स्पर्धेत आता आपण कुठेही यात मागे नाही.

या सर्व उपचारांचा मुख्य आणि मूलभूत उद्देश एकच असतो तो म्हणजे, कॅन्सरला शरीरातून दूर करणे आणि पुन्हा तो कधीही परत येणार नाही असा प्रयत्न करणे. कमीत कमी साईड इफेक्‍ट आणि गुंतागुंत निर्माण होणार नाही याची दक्षता घेत कॅन्सर दूर करण्याची शस्त्रक्रिया केली जाते. परंतु कॅन्सरचा प्रकार आणि त्याचा प्रकार व पद्धती लक्षात घेऊन काही वेळेस शस्त्रक्रिया पुरेशी ठरत नाही. आणि त्याचवेळी रेडिओथेरपी आणि केमोथेरपी यांचे महत्त्व अधोरेखीत होते.

कॅन्सरसंबंधातील विविध संकेतस्थळांवर जे अभ्यास दिलेले आहेत त्यातून असे दिसून येते की कॅन्सरच्या अद्ययावत अशा रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीमुळे त्याची टिकून राहण्याची क्षमता वाढत असल्याचे आणि पुन्हा परत येण्याची प्रवृत्ती लक्षणीयरित्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे. रेडिएशन थेरपी ही एक स्थानिक उपचार पद्धती असून त्यामध्ये कॅन्सरशी संबंधित पेशी कायमस्वरुपी संपवून टाकण्याची क्षमता बाळगून असते.

गेल्या दशकभरात नव्याने संशोधन होऊन सादर झालेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे आपण आता अधिक नेमक्‍या तंत्राने रेडिएशन देऊ शकतो. त्यामुळे त्याचा अधिकाधीक परिणाम कॅन्सरग्रस्त पेशींवर आणि कमीत कमी सामान्य अवयवांवर होतो. त्यामुळे कॅन्सरच्या उपचारांमध्ये साईड इफेक्‍टचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

रेडिएशनमधील नव्या संशोधनामुळे आता अधिक परिणामकारकता वाढली असून त्यामुळे वेदना कमी करणे आणि हाडांमध्ये पसरलेला आणि अधिक विकसीत स्वरुप धारण केलेल्या कॅन्सरमध्ये जी फ्रॅक्‍चर्स होतात ते रोखणे आता शक्‍य झाले आहे. त्यामुळे भविष्यात असे रुग्ण वेदनारहित आणि आरामदायी आयुष्यसुद्धा जगू शकतात. सर्जिकल ऑन्कॉलॉजी, मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि रेडिएशन ऑन्कॉलॉजी यांच्या एकत्रित आणि सामुहिक अशा सहयोगातून कॅन्सरवर उपचार करणे आवश्‍यक असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)