लडाख मधील भाजप खासदाराचा राजीनामा 

जम्मू – लडाख मधील लोकसभेचे भाजपचे खासदार थुपस्तान छेवांग यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. खोटी आश्‍वासने आणि भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे निराश होऊन आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या कारभाराला कंटाळूनच आपण राजीनामा दिला आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तथापी भाजपच्या नेत्यांनी मात्र त्यांनी राजकारणापासून दूर जाऊन अध्यात्माकडे जाण्यासाठी पक्षाचा व खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले होते. या दाव्याचा छेवांग यांनी इन्कार केला. माझ्या राजीनाम्या विषयी सुद्धा ते खोटी माहिती देत आहेत असे ते म्हणाले. लडाखला सहा महिन्यात स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे आश्‍वासन त्यांनी निवडणुकीत दिले होते पण सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाहीं म्हणून ते व्यथित झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)