लडाख कौन्सिल निवडणूकीत नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक जागा

श्रीनगर – लडाख ऍटानॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. तथापी या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. गेल्या 27 ऑगस्टला त्या ठिकाणी मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी झाली त्यात फारूख अब्दुल्ल यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला 10 जागा मिळाल्या.

आठ जागा मिळवून कॉंग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर राहिला. मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी पक्षाला दोन, आणि भारतीय जनता पक्षाला केवळ एक जागा मिळाली. तथापी त्यांनी या कौन्सिल मध्ये जिंकलेली ही पहिली जागा आहे. याद्वारे भाजपने या कौन्सिल मध्ये आपले खाते उघडले आहे असे या पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

या कौन्सिलच्या एकूण 30 जागा आहेत त्यापैकी 26 जागांवर मतदान घेण्यात आले होते. चार जागा नियुक्तीपद्धतीने भरल्या जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)