लठ्ठपणा आणि वंध्यत्व

वंध्यत्व अर्थातच इन्फर्टिलिटी ही वैवाहिक जीवनात तणावग्रस्त करणारी मोठी समस्या होऊ लागली आहे. स्त्री अथवा पुरुष यांच्या प्रजनन क्षमतेवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. प्राथमिक तपासण्या व उपचार झाल्यानंतर अनेकवेळा रुग्णांना प्रथम वजन आटोक्‍यात आणा हा सल्ला दिला जातो.
अतिरिक्‍त वजनाचा व
प्रजनन क्षमतेचा काय संबंध?
अतिरिक्‍त लठ्ठपणामुळे स्त्री किंवा पुरुष यांच्यामधील हार्मोनस अनियंत्रित होऊन सशक्‍त बिजांड तयार होण्यासाठी अडथळा निर्माण होतो. अशियाई स्त्रियांच्या कंबरेचा घेर (भारती) 80 सेंमी. व पुरुषांच्या कमरेचा घेर 90 सें.मी. असेल तर ते लठ्ठपणाने ग्रासले आहेत असे आपण म्हणू शकतो. सामान्य बीएमआय 25 च्या पुढे नसावे. वेगवेगळ्या वयोगटात लठ्ठपणाची एक आजार म्हणून दिसून येणारी लक्षणे खालीलप्रमाणे-
प वयात आलेल्या मुलींना नियमित मासिक पाळी न येणे.
प अनावश्‍यक ठिकाणी केसांची वाढ होणे जसे की चेहरा, छाती, हनुवटी, ओठांच्यावर इत्यादी
या सर्व गोष्टींचे निदान पॉलिसिस्टिक ओवॅरीन डिसीज म्हणून होतो याचा अतिरिक्‍त चरबीशी अत्यंत निकटचा संबंध आहे. वाढत जाणाऱ्या वजनामुळे या अनियमिततेमध्ये फक्‍त भरच पडत आहे. परिणामी गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे प्रयत्नपूर्वक जरी गर्भधारणा झाली तरी नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यामध्ये अतिरिक्‍त लठ्ठपणा हा विविध कारणाने धोकादायक ठरू शकतो.
ती कारणे खालीलप्रमाणे-
प गरोदरपणामध्ये झालेला मधुमेह
प उच्च रक्‍तदाब
शास्त्रोक्‍त पद्धतीने उपचार घेतल्यानंतर पुढच्या गर्भधारणेमध्ये उच्च रक्‍तदाबाचा विकार आणि त्या अनुषंगाने येणारे संभाव्य धोके हे संपूर्णपणे टाळता येऊ शकतात.
पुरुषांमध्येसुद्धा अतिरिक्‍त वजन वंधत्वाला कारणीभूत ठरू शकतो. कंबरेचा वाढता घेर, स्त्रियांसारखी होणारी स्तनांची वाढ ते शरीरातील वाढत्या फिमेल्स हार्मोन्स आणि कमी होत जाणाऱ्या मेल हार्मोन्सचे एक लक्षण असू शकते. स्त्री अथवा पुरुष दोघांमध्ये अति लठ्ठपणामुळे बदलेले हार्मोन्स हा मेटाबोलिजम (चयापचय) चा एक विकार आहे.
अतिरिक्‍त साठलेली चरबी ही बिघडलेल्या मेटाबोलिजमचा परिणाम आहे. त्यातूनच अनेक विचार जन्म घेतात. जसे की मधुमेह, उच्च रक्‍तदाब, वंध्यत्व इत्यादी. शास्त्रोक्‍त उपचार पद्धतीमुळे
मेटाबोलिजम, संपूर्ण नॉर्मल होऊ शकते. वरील व्याधी टाळता तर येतातच परंतु आलेल्या व्याधीपासूनही संपूर्ण मुक्‍तता मिळवता येणे शक्‍य आहे. हार्मोन्समधील बिघडलेल्या संतुलनामुळे अतिलठ्ठ व्यक्‍तींना फक्‍त आहाराचे नियंत्रण, व्यायामाचा अंतर्भाव यामुळे परिणामकाररित्या वजन घटविता येणे ही अतिशय अवघड गोष्ट ठरते.
बेरिऍट्रीक सर्जरी हा हार्मोन्समधील संतुलन परत आणण्याचा खात्रीशीर उपाय आहे. या उपचारानंतर अतिरिक्‍त वजनात घट तर होतेच शिवाय सांगितलेली सर्व लक्षणे संपूर्णपणे नॉर्मल होतात. नियमित पाळी येणे, सशक्‍त बिजांड तयार होणे आणि बाह्य उपचारांची मदत न घेता नैसर्गिक गर्भधारणा होणे हे फायदे होतात.
दुर्बिणीतून शस्त्रक्रिया असल्यामुळे शस्त्रक्रिया बिनटाक्‍याची होऊ शकते. हॉस्पिटलमध्ये दीड किंवा दोन दिवस राहावे लागते आणि डिस्चार्जनंतर एक ते दोन दिवसात तुमची दिनचर्या पूर्ववत होऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर शक्‍यतो आठ ते दहा महिने रुग्णाला विश्रांतीचा सल्ला दिला जातो. नंतर नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होऊन सुदृढ बाळ जन्माला येऊ शकते.
वंध्यत्वाच्या उपचारासाठी
करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया
प गॅस्ट्रिक बॅण्डिंग-
यामध्ये जठराच्या भोवती एक बांगडी सारखी चकती बसविली जाते आणि आवश्‍यकतेनुसार ती घट्ट किंवा सैल करता येते.
प स्लिव्ह गॅस्ट्रेकल्मी-
यामध्ये आपोआपच भुकेवर नियंत्रण येते व विनासायास वजन नियंत्रणात येते. यात जठराला हॉकी स्टिकसारखा आकार दिला जातो.
प गॅस्ट्रिक बलून-
यामध्ये एन्डोस्कोपीद्वारे एक फुगा पोटात सोडला जातो. ज्यामुळे भूक आपोआपच मंद होते आणि वजन घटण्यास मदत होते. परंतु सहा महिन्यानंतर फुगा काढून टाकावा लागतो.
कोणत्याही पद्धतीने उपचार केल्यास साधारण एक वर्षामध्ये 20 ते 60 टक्केपर्यंत अतिरिक्‍त वजन कमी होऊ शकते. त्यांनतर गर्भधारणा होऊन बाळाची योग्य पद्धतीने वाढ होते.
अशा पद्धतीने अनेक रुग्णांवर आम्ही उपचार केले आहेत. बाळ होण्याची अनेक वर्षाची आस पूर्ण झाल्यानंतर आई जेव्हा आपले बाळ कुशीत घेते तेव्हा तिला झालेले आत्मिक समाधान जगातील कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त मोलाचे असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)