लठ्ठपणा आणि प्रेग्नन्सी (भाग १)

वंध्यत्व ही समस्या झपाट्याने वाढणारी असून त्याचे दुष्परिणाम दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आहार, अनुवंशिकता, पर्यावरण ही कारणं वंध्यत्वाला कारणीभूत ठरत असली तरी लठ्ठपणामुळेदेखील गर्भधारणेत अनेक अडचणी येतात. अतिरिक्त चरबीमुळे बाळंतपणात आणि प्रसूतीनंतरही अनेक समस्या उद्‌भवू शकतात. केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषांमधील लठ्ठपणामुळेही अनेक समस्या उद्‌भवतात.

अतिरिक्‍त वजन हे कुणासाठीही वाईटच! लठ्ठपणामुळे शरीरात असणाऱ्या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. शरीरातील मेदाच्या साठ्यामुळे हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात. परिणामी, गर्भधारणेची प्रक्रिया अवघड होते. स्त्रियांमधील लठ्ठपणामुळे त्यांच्या जननसंस्थेच्या आरोग्यावर होणारा परिणाम चिंताजनक असतो. वाढलेलं वजन गर्भधारणेत आणि प्रसूतीनंतरही अडचण निर्माण करू शकतं. तसंच पुरुषांमध्ये असलेला लठ्ठपणा अनेक प्रश्‍न निर्माण करतो. त्यात शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रश्‍नांचाही समावेश आहे. शरीरातील अतिरिक्‍त चरबीचा अत्यावश्‍यक असणाऱ्या हार्मोन्सच्या निर्मितीशी थेट संबंध असतो. या हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंचं प्रमाण कमी होतं तर स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (पीसीओज) हा आजार उद्भवतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अलीकडेच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बॉडी-मास इंडेक्‍स (बीएमआय)चं अतिरिक्‍त प्रमाण असलेल्या स्त्री-पुरुषांमधे प्रजनन क्षमता नष्ट होण्याचं प्रमाण सर्वसाधारण वजनाच्या लोकांपेक्षा जास्त असतं, तर प्रजननक्षमता नष्ट झालेल्या टक्‍के स्त्रिया लठ्ठपणालाही बळी पडलेल्या असतात, असं अहवाल सांगतो. या माहितीनुसार पुरुषांचं वजन नऊ किलोग्रॅमने वाढल्यास त्यांच्यातील प्रजनन क्षमतेचा ऱ्हास किमान टक्‍ के होतो. लठ्ठ माणसांमध्ये शुक्राणूंचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे गर्भधारणेची शक्‍यताही कमी होते.

प्रजनन क्षमतेचा ऱ्हास होण्यामागे विविध कारणं असली तरी शरीराचं वाढलेलं वजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. जवळपास सर्वच हार्मोन्सच्या अनियमिततेचं कारण लठ्ठपणा असल्याचं समजलं जातं. लठ्ठपणामुळे गर्भधारणेचं प्रमाण कमी होतंच त्याचबरोबर कामेच्छाही कमी होते. शरीरातील अतिरिक्‍त चरबीमुळे शरीरसंबंधावर परिणाम होत असतो. गर्भधारणा होत नसल्यास लठ्ठ स्त्रियांनी वाढलेलं वजन कमी केल्यास गर्भधारणा सहज शक्‍य होते.

प्रजनन क्षमता नष्ट होण्याची लक्षणं 
1. गरज नसताना केसांची वाढ
2. मानेच्या वळ्यांमध्ये काळे डाग वाढणे (अकॅंन्थोसिस)
3. याशिवाय गर्भधारणेच्या काळात तात्पुरता मधुमेह होण्याचं प्रमाणही खूप वाढतं.
4. विशेषत: हे प्रमाण लठ्ठपणा आणि मधुमेहाची अनुवंशिकता असेल तर जास्त असतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)