लठ्ठपणा आणि प्रेग्नन्सी  (भाग २)

लठ्ठपणा आणि प्रेग्नन्सी  (भाग १)

लठ्ठपणाचे गर्भधारणेवरील परिणाम 
शरीराचं वजन आणि अतिरिक्‍त चरबी किंवा मेद वितरण या गोष्टींचा परिणाम स्त्रियांच्या गर्भधारणेवर होत असतो. लठ्ठ वजनाच्या स्त्रियांमधील गर्भाशयाची यंत्रणा बिघडते आणि बीजधारणेवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये मासिक पाळीच्याही समस्या दिसून येतात. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस)सारख्या आजारांमध्ये शरीरातील हार्मोन्स अनियमित होतात. त्यामुळे गर्भाशयावर छोटी पुटं निर्माण होऊन गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. तसंच गर्भधारणेची शक्‍यता कमी होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुषांमधील वजनवाढ 
आणि प्रजनन क्षमतेचा ऱ्हास 
पुरुषांमधील लठ्ठपणामुळे टेस्टिक्‍युलर यंत्रणेचा ऱ्हास होतो. अतिरिक्‍त चरबीच्या अनियमित वितरणामुळे पुरुषांमधील हार्मोन्सचं रूपांतर स्त्रियांमध्ये जास्त असणाऱ्या हार्मोन्समध्ये होतं. त्यामुळे पुरुषांच्या छातीच्या भागात चरबीचं प्रमाण तर वाढतंच त्याचबरोबर शुक्राणूंच्या निर्मितीतही घट होते.

लठ्ठ स्त्रिया गर्भवती असतानाच्या समस्या 
गर्भपात : अनेक लठ्ठ स्त्रिया गर्भवती राहिल्या तरी सुरुवातीच्या काळातील गर्भधारणा पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होतात. तसंच रक्तदाब वाढतो परिणामी गर्भपात होण्याचीही शक्‍यता अधिक निर्माण होते.
प्रसूतीमधील अडचणी : बाळाचा जन्म होण्याच्या काळातही अतिरिक्त वजनामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्यात हृदयविकार, टाइप मधुमेह, लिव्हरची समस्या, नैराश्‍य अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे आई आणि मुलाच्या आयुष्याला धोका निर्माण होतो. अनेकदा या लठ्ठ स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह निर्माण होतो. त्यामुळे प्रसूती नीट होऊ शकत नाही.

आरोग्याचे प्रश्‍न : लठ्ठपणामुळे ग्लुकोजचं प्रमाण कमी-जास्त होऊ शकतं आणि स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी इंडयूस्ड हायपरटेन्शनची समस्या निर्माण होते. गर्भवती असताना वजन वाढल्यास पुढील काळात स्त्रियांना लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. विशेषत: मेटाबॉलिक सिंड्रोम, हदयविकार असे त्रास होऊ शकतात.

उपाययोजना आणि उपचार लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित आजारांच्या उपचारांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्‍यकता आहे. स्त्री-पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेचा ऱ्हास टाळण्यासाठी जागृती आणि जाणीव निर्माण करणं आवश्‍यक आहे. कारण पहिल्या काही टप्प्यांमध्येच ही गोष्ट टाळता येईल. जास्त वजन असलेल्या लोकांना एका चांगल्या डॉक्‍टरचा सल्ला घेण्याची आवश्‍यकता भासते. केवळ जिममध्ये किंवा आहारतज्ज्ञांकडे जाण्यापेक्षा आपल्याला असलेला प्रश्‍न समजून घेऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन उपचार करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते.

अतिलठ्ठ लोकांमध्ये बॅरिऍट्रिक शस्त्रक्रिया करणं आवश्‍यक असतं. अतिरिक्‍त वजन असलेल्या आणि सोबत टाइप मधुमेह, हृदयविकार, ऑस्टिओ आर्थरायटिस, लिव्हरसारखे आदी प्रश्‍न असलेल्या लोकांना वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्‍यकता भासते. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर शरीरातील रचनात्मक बदलांमुळे रुग्णाला आरोग्यपूर्ण जीवनशैली अवलंबता येते. या शस्त्रक्रियेनंतर स्त्री-पुरुषांमधील प्रजनन क्षमतेत वाढ होते. पण केवळ शस्त्रक्रिया केल्यावर सर्व प्रश्‍न सुटत नाहीत. त्याबरोबर योग्य व्यायाम आणि आहाराचीही आवश्‍यकता असते. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतरही वजन योग्य ठेवण्यास मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)