लग्न मंडपातून ऐवज लंपास

चऱ्होली – लग्न समारंभात फोटो काढण्यासाठी स्टेजवर जाताना शेजारच्या खुर्चीवर ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 81 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पुणे-आळंदी रस्त्यावरील चऱ्होली येथील संकल्प गार्डन येथे रविवारी (दि. 28) रात्री नऊच्या सुमारास घडली.

प्राची सोनावणे (वय-31, जुई नगर, नवी मुंबई) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राची सोनावणे या एका लग्न समारंभासाठी या मंगल कार्यालयात आल्या होत्या. फोटो काढण्यासाठी स्टेजवर जाताना त्यांनी आपली पर्स शेजारील खुर्चीवर ठेवली असता चोरट्याने पर्स पळवून पर्समधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घड्याळ असा 81 हजार 800 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)