लग्न घटिका समीप असतनाच नवरदेवाचा मृत्यू

सांगली:  लग्नाला उभे राहण्यासाठी काही क्षणाचा अवधी होता, त्यासाठी नवरदेवाची तयारी सुरु होती, मात्र त्याचवेळी नियतीने सारा खेळ बिघडवला.
लग्नाची तयारी सुरु असताना हृदयविकाराच्या धक्क्याने नवरदेवाचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. रवी मदन पिसे असे या दुर्दैवी नवरदेवाचे नाव आहे. रवी हा 27 वर्षांचा होता. रवीचे आज लग्न होते. त्यासाठी त्याची तयारी सुरु होती. मात्र अचानक रवीच्या छातीत दुखू लागले. त्याला तातडीने मिरजेतील मिशन रुग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रवीच्या या दुर्दैवी अंतामुळे अख्खा परिसर शोकसागरात बुडाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)