लग्नास नकार तरुणीची आत्महत्या

पिंपरी – लग्नास नकार दिल्याने तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 14 ) रात्री साडेअकराच्या सुमारास सांगवी येथे घडली.

ईश्‍वरी बाबुराव पोकळे (वय-23) असे मयत मुलीचे नाव असून ती तिच्या मित्रासोबत रहात होती. ईश्‍वरी ही एमकॉमची विद्यार्थीनी होती. गेल्या दीड वर्षांपासून ती एका आयटीतील तरुणासोबत “लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. तरुणाचे नुकतेच लग्न ठरल्याने तिला नैराश्‍य आहे.

-Ads-

दरम्यान तरुणानेही लग्नास नकार दिल्याने तिने राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. सांगवी परिसरातच “लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या एकाने चाकू हल्ला करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असताना ही दुसरी घटना समोर आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)