कायदा आयोगाने केली सूचना
नवी दिल्ली – लग्नासाठी तरुण आणि तरुणीचे किमान वय समान ठेवा, अशी सूचना कायदा आयोगाने केली आहे. पुरुषांसाठी लग्नाचे वय 21 वर्ष आणि महिलांसाठी 18 वर्ष हे चुकीचे असल्याचे कायदा आयोगाने म्हटले आहे. लग्नासाठी पुरुषाचे वय स्त्रीपेक्षा जास्त असावे, असा समज आहे. पंरतु कायदेशीररित्या प्रौढ होण्याची वयोमर्यात 18 वर्ष आहे. त्यामुळे विवाहासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी 18 वर्षे वयोमर्यादा योग्य आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

कायदा आगोयाने समान नागरिक हक्क आणि पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची सूचना केली आहे. अनेक लोकांशी चर्चा करुन कायदा आणि सामाजिक परिस्थितीच्या पुनरावलोकनच्या आधारावर कायदा आयोगाने म्हटले आहे की, सध्या देशात समान नागरी कायद्याची गरज नसून सध्याच्या पर्सनल लॉमध्ये सुधारणा गरजेची आहे. मूलभूत अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्यामध्ये संतुलन हवे, असे मत नोंदविले.

कौटुंबिक मुद्द्यांशी संबंधित पर्सनल लॉमध्ये क्रमवार संग्रह करण्यावर विचार करावा. सर्व समाजांमध्ये समानता आणण्याआधी एका समुदायामध्ये स्त्री-पुरुषांच्या अधिकारांमध्ये समानता आणण्याचा गरज आहे.
कायदेशीररित्या मान्य विवाहातून जन्म न झालेल्या प्रत्येक धर्मातील मुलांना संपत्तीमध्ये वाटा देणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कायदा बनवण्यात यावा.

तसेच स्पेशल मॅरेज ऍक्‍ट अतंर्गत लग्नाआधी आई-वडिलांना 30 दिवसांची नोटीस देण्याची अट काढून टाकावी. या तरतुदीचा दुरुपयोग लग्न करणाऱ्या जोडप्या धमकावण्यासाठी, लग्नात अडथळा आणण्यासाठी केला जातो. जर 30 दिवसांच्या नोटीसची तरतूद काढता आली नाही, तर जोडप्यांना सुरक्षा देण्यात यावी, असेही आयोगाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)