लग्नासाठी रणवीर-दीपिका इटलीला रवाना 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे पुढील आठवडयात 14 नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची तारीख, ते कोठे होणार, याबाबत अनेक महिन्यांपासून चर्चा रंगत होत्या. अखेर लग्नाची तारीख आणि स्थळही निश्‍चित झाले आहे. लग्नासाठी रणवीर आणि दीपिका दोघेही शुक्रवारी रात्री इटलीला रवाना झाले आहेत.
विशेष म्हणजे, विमानतळावर दोघांचा लुकही एकमेकांसारखा होता. रणवीर सिंह हा पांढ-या रंगाच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये, तर दीपिका ही पांढ-या रंगाच्या स्कर्टमध्ये होती. इटलीला रवाना होण्यापूर्वी दोघांनीही नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमांना सामोरे गेले. दोघांच्याही चेह-यावर वेडिंग ग्लो दिसून येत होता. तसेच विमानतळावर दोघांच्यासोबत रणवीर सिंहचे वडीलही होते.

दरम्यान, दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली असून ते दोघे केव्हा बाहुल्यावर चढतात याची ओढ लागली आहे. बॉलीवूडमधील या कम्पल्स्‌चा शाही विवाह सोहळा 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर इटलीवरून परतल्यावर मुंबईत सेलिब्रेशन पार्टी आयोजित करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)