लग्नासाठी निक भारतात दाखल 

बॉलीवूडची देशीगर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडमधील गायक निक जोन्स यांच्या लग्नसोहळयाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. निक जोन्स अमेरिकेवरून गुरुवारी दिल्लीत दाखल झाला आहे. प्रियांकाही आपल्या आगामी “द स्काई इज पिंक’ चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त दिल्लीत आहे. हे दोघे जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी भेटणार असल्याची चर्चा आहे.

प्रियांका आणि निक यांचा विवाहसोहळा जोधपुर येथील शाही उम्मेद भवन पॅलेसमध्ये होणार आहे. या सोहळा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यत रंगणार आहे. यासाठी निक जोन्स भारतात दाखल झाला आहे. तसेच प्रियांका आणि निक हे पंतप्रधान मोदींसह इतर व्हीआयपी पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी जाणार आहेत.

-Ads-

दरम्यान, प्रियांकाने आपल्या ब्राइडल शॅवर आणि बॅचलरेट पार्टीचेही शानदार सेलिब्रेशन केले होते. प्रियांकाचा विवाह ख्रिश्‍चन पद्धतीने होणार असल्याचे समजते. जोधपुर येथे लग्नाची जययत तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाची आई मधु चोप्रा या तयारीचा आढावा घेण्यासाठी जोधपुरला आल्या होत्या. तसेच विवाहस्थळ निश्‍चित करण्या पूर्वी प्रियांका आणि निक यांनी जोधपुर भेट दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)