लग्नाला जाताना महिलेचे दागिने लंपास

कराड, दि. 10 (प्रतिनिधी) -नातेवाईकांच्या लग्नासाठी रिक्षातून निघालेल्या महिलेच्या पर्समधील सव्वा लाखाचे साडे चार तोळ्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास विजय दिवस चौक ते सह्याद्रि मंगल कार्यालय दरम्यानच्या प्रवासात घडली. याबाबत मुमताज बाबालाल सय्यद (रा. आगाशिवनगर-मलकापूर, ता. कराड) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुमताज सय्यद या शुक्रवारी दुपारी कुटूंबियांसमवेत नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी विजय दिवस चौकात आल्या होत्या. तेथे त्या रिक्षात बसल्या. त्यांच्यासोबत त्यांचे कुटूंबिय व अन्य प्रवासी होते. सह्याद्रि मंगल कार्यालयाजवळ त्या रिक्षातून उतरल्या. रिक्षा निघून गेल्यानंतर त्यांनी पर्स तपासली असता त्यामधील 3 तोळे सोन्याचे गंठण, 12 ग्रॅम वजनाची मोहनमाळ गायब होती. त्यामुळे रिक्षा प्रवासात दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)