लग्नाच्या दिवशीच इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

नाशिक – इंजिनिअर तरुणाने लग्नाच्या दिवशीच राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देवळा तालुक्‍यातील पिंपळगाव वाखारी येथे घडली. एक दिवस आधीच हळदीच्या कार्यक्रमात आनंदात असणाऱ्या प्रशांत खैरनारने लग्नाच्या दिवशीच हे कृत्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव वाखारी येथील प्रगतिशील शेतकरी नामदेव संपत खैरनार यांचा मुलगा प्रशांत नामदेव खैरनार याचा विवाह वडनेर खाकुर्डी येथे होणार होता. प्रशांत नाशिक येथील डी.जी.एस.टी.एस. या खाजगी कंपनीत ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरीस होता.
विवाह समारंभ असल्याने तो सहा दिवसांपूर्वीच येथे आला होता. त्याला विवाहाच्या आदल्या दिवशीच सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत हळद लावण्यात आली. रात्री 12 वाजेपर्यंत सर्व मित्रमंडळी, नातेवाईक वरातीत नाचले. सकाळी वरात निघण्याच्या वेळेस नवरदेव प्रशांतची शोधाशोध सुरू झाली. परंतु पहाटेच्या सुमारास जवळील रिकाम्या घरात त्याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. लग्नाच्या तयारीत असलेल्या खैरनार परिवारासह वधूच्या नातेवाईकांवर वराचा अंत्यविधी करण्याची वेळ आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)