लग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना 

बॉलिवूडच्या वेडिंग सीझनमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या पहिल्या एपिसोडनंतर आता दुसरा एपिसोड प्रियांका आणि निकच्या विवाहाचा होणार आहे. पुढील महिन्यात 2 डिसेंबरला प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे लग्न होणार आहे. जोधपूरच्या भव्य उम्मेद भवन पॅलेसमध्ये हा विवाह समारंभ होणार आहे. या पॅलेसची सजावट वेडिंग सेरिमनीसाठी केली जाते आहे.

ही तयारी बघण्यासाठी प्रियांका आणि तिची आई जोधपूरला रवाना झाल्या आहेत. प्रियांकाने खास लग्नासाठीचे दागिने जोधपूरमध्येच तयार करवून घेतले आहेत. ही तयारी बघितल्यावर प्रियांका लगेच संध्याकाळी मुंबईला परतणार आहे.तर पुढील कामावर देखरेख करण्यासाठी प्रियांकाची आई तिथेच राहणार आहे.

-Ads-

लग्नाच्या सगळ्या इव्हेंटची जबाबदारी ताज ग्रुपवर सोपवण्यात आली आहे. या सगळ्या विवाह समारंभाच्या वार्तांकन आणि मिडीया कव्हरेजचे हक्क एका मॅगझीनला विकण्यात आले आहेत. विवाहाचे मेन्यू, पाहुण्यांची व्यवस्था, मिडीया कव्हरेज, सिक्‍युरिटी, व्हिआयपींची सोय आणि अन्य बारिकसारीक गोष्टींची व्यवस्था प्रियांकाची आई ताज ग्रुपबरोबर चर्चा करून निश्‍चित करणार आहे. प्रियांका आणि तिची आई मेहरानगडलाही जाणार आहेत. तिथे विवाहापूर्वीचे मेंदीचे विधी होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
1 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)