लग्नाच्या आमिषाने 80 हजारांचा गंडा

पिंपरी – लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून 80 हजार रुपये बँक खात्यावर घेतले. पैसे बँक खात्यावर येताच भावी पती नॉट रिचेबल झाला. ही घटना फेब्रुवारीपासून आजपर्यंत घडली.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्र मेनॉर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांनी विवाहाकरिता भारत मेट्रोमनी या संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. तिथेच दोघांची ओळख झाली. आपण विदेशात डॉक्टर आहोत आणि लवकरच भारतात येणार आहे. भारतात येताच आपण लग्न करू, असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. 23 फेब्रुवारी रोजी भारतात आलो असून कस्टममधील आपले साहित्य मिळविण्यासाठी भारतीय चलन नसल्याचे सांगितले. त्यासाठी सुरुवातीला महिलेला 30 हजार रुपये खात्यावर भरण्यास सांगितले. खात्यावर पैसे आले नाहीत, असे सांगत पुन्हा दुस-या खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. महिलेने दोनवेळा एकूण 79 हजार 800 रुपये राजेंद्रच्या खात्यावर पाठविले. पैसे खात्यावर येताच राजेंद्रने आपला मोबाईल फोन बंद केला. वारंवार संपर्क करून देखील संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने चिंचवड पोलिसात धाव घेतली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)