लग्नाच्या आमिषाने युवतीची फसवणूक

युवकासह बहीण,वडीलावर गुन्हा दाखल
सातारा,दि.3 (प्रतिनिधी)
लग्न करतो असे सांगुन युवतीची आर्थीक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विकी पवार, त्याची चुलत बहीण व वडील (दोघांची पुर्ण नावे नाहीत) यांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पिडीत युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विकी व पिडीतीचे प्रेम संबंध होते. त्याचा गैरफायदा घेत आरोपींनी माझ्या मुलीकडून दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तीस हजार रुपये वेळोवेळी घेतली. त्यावेळी तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच तिला वेळोवेळी शरीर सुखाची मागणी करून शारीरीक व मानसिक त्रास दिला. याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर दमदाटी करून लग्नाला नकार दिला. याप्रकणाचा पुढील तपास सातारा शहर पोलिस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)