लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणारा लखोबा लोखंडे गजाआड

पुणे,दि. 13- विवाहविषयक वेबसाईटवर तरुणींनीना लग्नाचे आमिष दाखवून  लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयास हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तरुणाने आजवर पाच जणींची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. तर एकूण तेरा तरुणींनी त्याच्या प्रोफाईलला प्रतिसाद दिला होता. यातील पाच जणी त्याच्या जाळ्यात अडकल्याअसून त्यांची जवळपास 8 ते 10 लाखांची फसवणूक झाली आहे.

कृष्णा चंद्रसेन देवकाते (वय 30, रा. पुराणिक सिटी, ठाणे ) असे आरोपीचे नाव आहे. त्याने बनावट नावाचा वापर करून पुणे, ठाणे, नवी मुबई या ठिकाणी जीवनसाथी या वेबसाईटवर लग्नासाठी नाव नोंदवले होते. हडपसर येथील एका तरुणीची साडेपाच लाखाची फसवणूक झाल्यावर तीने याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तीने एप्रिल 2017 मध्ये प्रज्वल देशमुख नावाच्या व्यक्तीचे जीवनसाथी डॉट कॉमवर प्रोफाईल पसंत पडल्याने त्यास संमंती पाठवली होती. यानंतर मोबाईल, व्हॉटसअप व प्रत्यक्षात भेट घेतल्यावर त्याने विश्‍वास संपादन करुन लग्नाचे आमिष दाखवले होते. यानंतर त्याने फिर्यादी तरुणीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी गरज असल्याचे सांगत 5 लाख 50 हजार रुपये घेतले. हे पैसे घेतल्यानंरत त्याने फिर्यादी तरुणीशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यावर तपास करता, आरोपीचे नाव प्रज्वल देशमुख नसून खरे नाव कृष्णा चंद्रसेन देवकाते असल्याचे लक्षात आले.
* आरोपीला उच्च राहणीमानाची आवड *
आरोपी मध्यमवर्गीय कुटूंबातील आहे, मात्र त्याला उच्च रहाणीमानाची सवय आहे. त्याने मुंबईतील अंधेरी भवन्स महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी घेतली आहे. मागील दहा वर्षापासून तो वेगवेगळ्या बीपीओमध्ये काम करत आहे. पैशाची चणचण असल्याने व कॉलसेंटरमध्ये काम करण्याचा अनुभव असल्याने त्याने जीवनसाथी डॉट कॉमवर स्वत:चे प्रज्वल देशमुख नावाने बोगस प्रोफाईल तयार केले. यामध्ये त्याने उच्च शिक्षीत असून एक ते दिड लाख रुपये मासिक उत्पन्न असल्याचे दाखवले. मात्र तो सध्या काहीही कामधंदा करत नसून पत्नीसह कल्याण येथे रहातो.
* अशी होती कार्यपध्दती *
महिलांशी जीवनसाथी डॉट कॉमवर संपर्क साधल्यानंतर त्यो ओळख झालेल्या महिलांशी मोबाईल क्रमांक शेअर करायचा. यानंतर व्हॉटसअप व इतर सोशल नेटवर्कींग साईटवरुन त्यांचा विश्‍वास संपादन करुन लग्नाचे आमिष दाखवायचा. त्याच्या आमिषाला बळी पडलेल्या महिलांना तो आर्थीक अडचणीत असल्याचे सांगून त्यांच्याकडून दोन ते पाच लाख रुपये रोख किंवा धनादेशाच्या माध्यमातून उकळत असे.
याप्रकरणी त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल असून याचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)