लग्नाच्या आमिषाने घटस्फोटित महिलेवर बलात्कार

लोणी काळभोर- घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तातडीने हालचाली करीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ तासांच्या आत त्याला जालना येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
संतोष गायकवाड (वय 32. रा. थेऊर, ता. हवेली) याला जालना येथून अटक केली आहे. या संदर्भात एका घटस्फोटित महिलेने तक्रार दाखल केली आहे. संतोष गायकवाड विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर महिला आई-वडिलांसोबत माहेरी रहात आहे. उदरनिर्वाहासाठी ही महिला एका खासगी ठिकाणी कामाला जाते. कामाच्या ठिकाणी या महिलेची व संतोष गायकवाडची ओळख झाली होती.
संतोष गायकवाडने आपण लग्न करू असे आश्‍वासन दिले होते. महिलेने माझे लग्न झाले असून मला एक मुलगी आहे, अशी माहिती त्याला दिली होती. तरीही आपण लग्न करू असे आश्‍वासन त्याने महिलेला दिले होते. एप्रिल 2017 मध्ये संतोष काही तरी काम काढून महिलेच्या घराजवळ आला होता. त्यावेळी त्याने बोलण्यासाठी म्हणून महिलेला बोलावून घेतले. यावेळी वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर महिला गरोदर राहिली. त्यामुळे ती संतोषला लग्नाबाबतीत सतत विचारणा करू लागली. या गोष्टीला वैतागून संतोष त्याच्या सासुरवाडी असलेल्या जालना या ठिकाणी रहायला गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखलझाल्यानंतर तातडीने हालचाली करीत पोलिसांनी आठतासांच्या आत त्याला जालना येथून जेरबंद केले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले, हवालदार नितीन सुद्रिक करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)