लग्नाच्या आमिषाने अडीच लाखांची फसवणूक

पिंपरी- लग्न जुळवणार्या एका संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्‍तीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची अडीच लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.

याबाबत वाकड येथे राहणाऱ्या 31 वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार मोबाइल धारक व्यक्‍तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2018 ते 11 मे 2018 या कालावधीमध्ये शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्‍तीने फिर्यादी तरूणीला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच तिला भेटवस्तू पाठविल्याचे सांगून ती भेटवस्तू कस्टममध्ये अडकल्याचे सांगितले. ती भेटवस्तू न सोडविल्यास दहशतवाद विरोधी कायद्यानुसार कारवाई होईल, अशी भिती दाखविली. वेगवेगळे कर व शुल्क यांची नावे सांगून महिलेला दोन लाख 47 हजार रुपये भरण्यास भाग पडून तिची फसवणूक केली. याबाबत अधिक तपास सहायक निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)