लग्नाच्या अमिषाने तरुणीला पळवून केले अनैसर्गिक कृत्य

पुणे – लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याच्या साथीदाराला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्याला 21 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. हे कृत्य करणारा तरुणीला मूळगावी तामिळनाडू येथे पळून घेऊन गेला होता.
कृष्णस्वामी ऊर्फ कन्नन राजमणिक्कम (वय 38, रा. कोथरूड, मूळ. तामिळनाडू) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मुख्य आरोपी कुप्पू स्वामी ऊर्फ एलनगोवन राममूर्ती हा फरार आहे. त्यांच्या एका साथीदाराचा मृत्यू झाला आहे. याबाबत 29 वर्षीय तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 6 जुलै 2011 ते 11 मार्च 2017 या कालावधीत कोथरूड परिसरात घडली.
राममूर्ती आणि राजमणिक्कम हे दोघेही मूळचे तामिळनाडूचे आहेत. कामानिमित्त येथे राहत होते. त्यावेळी राममूर्ती याने फिर्यादी तरूणीशी ओळख वाढविली. सुरूवातीला लग्नाचे अमिष दाखवून त्यानंतर ब्लु फिल्म दाखवून गुंगीचे औषध पाजून आणि मारहाण करून तरूणीवर बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
हे कृत्य केल्यापासून आरोपी राममूर्ती फरार आहे. त्याचा साथीदार राजमणिक्कम याला तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने कोथरूड पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले. त्यावेळी राममूर्तीच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)