लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

नागठाणेतील युवकावर गुन्हा दाखल

नागठाणे – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी वारंवार शरीरसंबंध ठेऊन तिला गरोदर केल्याबद्दल नागठाणे (ता. सातारा) येथील युवकाविरुद्ध पोक्‍सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय राजेंद्र मोहिते (रा. बेघरवस्ती, नागठाणे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील नसल्याने ती भावंडांसमवेत राहते. सन 2018 मध्ये शेजारी राहणाऱ्या अक्षय मोहिते याने तिला जबरदस्तीने त्याच्या आजीच्या झोपडीत नेले. तेथे तिला लग्नाचे आमिष दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तीन-चार वेळा त्याने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत शरीरसंबंध ठेवले.

यामध्ये पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे तिच्या मावशीला निदर्शनास आल्यावर तिने मुलीकडे चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या मावशीने याची माहिती बोरगाव पोलिसांकडे दिली. मंगळवारी रात्री उशिरा संशयित अक्षय मोहिते यांच्याविरोधात पोक्‍सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)