लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपरी (प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला मागील काही दिवसांपासून लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)