लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

पिंपरी – लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी पीडित 25 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, परशुराम लक्ष्मण मोगल (वय-26, रा. तळोदा, रांजणी, नंदुरबार) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम आणि पीडित तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नोव्हेंबर 2017 ते मे 2018 दरम्यान परशुराम याने तरुणीसोबत जवळीक वाढवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. महिला पोलीस उपनिरीक्षक गाडे अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
1 :heart:
3 :joy:
1 :heart_eyes:
7 :blush:
7 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)