लग्नाचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार

पिंपरी – लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मायाप्पा सिताराम झिटे (वय-28, रा. विठ्ठलवाडी, वाघोली, पुणे) असे आरोपीचे नाव असून मुलीच्या पालकांनी या विरोधात भोसरी पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौदा वर्षांची पीडिता व आरोपीचे मैत्रीचे संबंध होते. यावेळी आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी शरीरसंबंध प्रस्थापीत केले. मात्र आरोपी आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच पीडितेने याबाबत घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)