लग्नाची तारीख जाहिर केल्यानंतर दीपिका-रणवीर बनले इन्टाग्रामवर नंबर वन!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून दिसणा-या तर्क-वितर्काच्या बातम्यांना पूर्णविराम लावत दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्रामवरून जाहिर केली. ह्यामुळे दोघांचीही इंस्टाग्रामवर सध्या सर्वाधिक लोकप्रियता दिसून येते आहे

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. ह्या आकडेवारीनुसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रणी स्थानी आपली वर्णी लावली आहे. बॉलीवूडमधल्या ह्या बहूचर्चित जोडीच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते खूप काळापासून पाहत होते. आणि आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरून दीपिका-रणवीरने दिलेल्या सुखद वृत्तानंतर इंस्टावर दीपिका-रणवीरच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रणवीरच्या शिवाय अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुध्दा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. तसेच, दीपिकाच्या शिवाय प्रियंका चोपड़ा, अनुष्का शर्मा, जैकलिन फर्नांडीज आणि सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगवर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)