लग्नसराईमुळे गुलाब, गुलछडीला मागणी वाढली

पिंपरी- लग्नसराई सुरू झाल्याने फुलांची आवक वाढली असून, मागणीदेखील वाढली आहे. विशेषत: सजावटीसाठी आवश्‍यक असलेल्या गुलाब, गुलछडी व गजऱ्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे फुलांचे भावदेखील 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वधारले आहेत.

फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढीलप्रमाणे-झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता)-80 ते 100 रुपये किलो, गुलछडी-100 ते 120 रुपये, जरबेरा बंडल- 80 ते 100 रुपये, तुकडा गुलाब (डच ) 100 ते 120 रुपये, गुलाब गड्डी (साधा)-20 ते 30 रुपये, गुलाब गड्डी (डच)- 100 ते 120 रुपये, अष्टर चार गड्डी- 12 ते 16 रुपये, अष्टर 60 ते 80 रुपये प्रतिकिलो, कागडा बंडल- 200 ते 250 रुपये, अबोली बंडल- 100 ते 120 रुपये. किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा प्रति नगाचा भाव 10 रुपये आहे; तर एक डझनचा भाव 100 रुपये एवढा आहे.
याशिवाय लग्नसराईनिमित्त फुलांच्या बुकेंना मोठी मागणी वाढली आहे. अगदी 100 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंतचे बुके बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. ग्राहकांचा मागणीनुसार बुक बनवून दिला जातो, अशी माहिती सप्तश्रृंगी पुष्प भांडारचे गणेश आहेर यांनी दिली. याशिवाय मार्गशिर्ष महिन्यातील महालक्षमी व्रतामुळे महिलांकडून पूजेच्या साहित्यालादेखील मोठी मागणी आहे
.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)