लग्नपत्रिकेसह धार्मिक ग्रंथ देऊन लग्नाचे अनोखे निमंत्रण

आळेफाटा-पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील सुभाष विद्या मंदिर या विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण भागुजी मंडलिक यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात होणाऱ्या सत्कार समारंभाला फाटा देऊन विवाह पत्रिकेबरोबरच श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या धार्मिक ग्रंथाची भेट देऊन निमंत्रण दिले आहे. पिंपळवंडी परिसरात प्रथमच हा आगळा वेगळा उपक्रम राबविल्यामुळे मंडलिक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंडलिक हे गेली पंचवीस वर्षांपासून पिंपळवंडी परिसरामधे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यातील सहभाग मोठा उल्लेखनीय आहे. उत्कृष्ट वक्‍ता, सहकारातील उत्तम अभ्यासक अशी त्यांची ख्याती आहे. पुणे जिल्ह्यातील अग्रेसर असलेल्या पिंपळवंडी येथील यशवंत पतसंस्थेचे आर्थिक सल्लागार व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे स्वीकृत संचालक पदावर सध्या ते काम करीत आहेत. पिंपळवंडी गावातील नवरात्रीच्या धार्मिक कार्यक्रमातून वारकरी विचारवंतांचे सानिध्य लाभल्याने संत साहित्याची गोडी लागली. समाजातील भरकटलेल्या विचारांना संतसाहित्यच दिपस्तंभाचे कार्य करू शकते, यामुळेच मुलाच्या विवाह समारंभातील सत्कार सोहळ्यांना अगोदरच फाटा देऊन हे ग्रंथदानाचे काम केले आहे, असे लक्ष्मण मंडलीक यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)