लक्‍झरी बसच्या धडकेत पादचारी ठार

उंब्रज – पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज, ता. कराड बसस्थानकासमोर महामार्गाच्या कडेने चालत जाणाऱ्या पादचाऱ्यास लक्‍झरी बसची धडक बसल्याने पादचारी जागीच ठार झाला. सदरची घटना रविवारी मध्यरात्री घडली. सुरेश कृष्णाजी बाठे (वय 50) रा. देवडी केतकावळी, जि. पुणे असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी मध्यरात्री 1.45 वाजण्याच्या सुमारास येथील सैनिक बॅंकेच्यासमोर महामार्गांवर पुणे दिशेकडे जाणारी लक्‍झरी क्र. एम. एच. 09- सीए- 597 ने महामार्गाच्या कडेने चालत जाणाऱ्या पादचाऱ्यास जोरदार धडक दिली. या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. या अपघाताची नोंद रात्री उशिरा उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार रवींद्र पवार करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)