लक्ष विचलित करण्यासाठीच विचारवंतावर कारवाई

तपास यंत्रणेवर राज्यशासनाचे दबावतंत्र : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

पुणे – “सनातनवरील कारवाई टाळण्यासाठी आणि या कारवाईचे लक्ष विचलित करण्यासाठीच राज्यशासन तपास यंत्रणेवर दबावतंत्राचा अवलंब करत आहे. त्यामुळेच विचारवंतावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत,’ असा आरोप माजी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. “राज्य शासनाचा हा प्रयत्न फार काळ टिकणार नाही,’ असा दावाही त्यांनी केला.

एका जाहीर कार्यक्रमासाठी चव्हाण शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, “दहशतवादी कारवायांमुळे सनातनवर कारवाई अटळ होती. त्यामुळे तपास यंत्रणांनी सनातनवर धडक कारवाई सुरू केली होती. त्यामुळे घाबरलेल्या शासनाने यावरील लक्ष विचलित करण्यासाठी ही कारवाई अन्यत्र वळविली आहे. त्यातूनच विचारवंतावर कारवाई करण्याचे षड्‌यंत्र राज्य शासनाने रचले आहे.’

“यापुढे महायुद्ध झालेच, तर ते पाण्यासाठीच होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याची आवश्‍यकता आहे. पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना त्यासाठीच माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या प्रयत्नातून राज्यभर राबविण्यात आली. आताच्या परिस्थितीत त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)