“लक्ष्य’ करिअर ऍकॅडमीमध्ये मुलींसाठी मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण

बुध – ललगुण, ता. खटाव येथील लक्ष्य करिअर ऍकॅडमीमध्ये सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी मुलींसाठी मोफत प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार मुलींनी याचा लाभ घ्यावा. यासाठी राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती प्रा. शंकरराव खापे यांनी दिली.

प्रा. खापे म्हणाले, आता कोल्हापूर बीआरओमध्ये 42 मुलांनी रनिंग काढून मेडिकल झाले आहे. 27 जानेवारी रोजी लेखी परीक्षा आहे. 2017-18 मध्ये पोलीस भरतीमध्ये 28 मुले यशस्वी होवून ट्रेनिंग करित आहेत. आगामी येणारी पोलीस भरती दोन माहिन्यात चालू होणार आहे. ही भरती मेघा भरती असून या भरतीसाठी 12500 जागा निघणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. शंकरराव खापे यांनी केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)