लक्ष्मी सदैव मंगलम मालिकेमध्ये रंगणार लक्ष्मीचा विवाहसोहळा

पुणे – कलर्स मराठीवरील नुकतीच सुरू झालेली “लक्ष्मी सदैव मंगलम’ ही मालिका सध्या बरीच चर्चेत असून या मालिकेतील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेमध्ये मल्हार म्हणजे ओमप्रकाश शिंदे, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांच्या मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

मालिकेमध्ये लक्ष्मीच्या लग्नाचा विवाहसोहळा रंगणार आहे. तिच्या लग्नाची तयारी म्हणजे मंडप लावणे, मेहंदीची तयारी मोठ्या उत्साहात गावात सुरू झाली आहे. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असलेल्या स्वप्नातला राजकुमार आता तिच्या आयुष्यात खरेच येणार आहे. आपले आयुष्य आता हा राजकुमार प्रेमाने बहरून टाकणार अशा स्वप्नांमध्ये लक्ष्मी आहे. ती आनंदाने लग्नाची तयारी करत आहे.

-Ads-

लक्ष्मीच्या स्वप्नातला राजकुमार तिला मिळणार का? तिचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का? यामध्ये मामी आणि श्रीकांत कुठली नवी खेळी रचणार? हे सगळे जाणून घेण्यासाठी कलर्स मराठीवरील 11 जून ते 16 जून चा संध्याकाळी सात वाजताचा लक्ष्मीचा विवाह सोहळा पहावाच लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)