लक्ष्मी विलास बॅंकेत आधार नोंदणी विस्तार

चेन्नई: लक्ष्मी विलास बॅंकेच्या (एलव्हीबी) 55 हून अधिक शाखांनी आधार नोंदणी व सुधारणा सेवा केंद्र स्थापन केले आहे. ग्राहकांना या सेवा केंद्रांमध्ये, प्रमाणित नोंदणी एजंटच्या मदतीने, नवे आधार कार्ड तयार करण्याची किंवा जुन्या आधार कार्डामध्ये बदल करण्याची सेवा ग्राहकांना मिळणार आहे. हा उपक्रम बॅंकेच्या ग्राहकांना व अन्य व्यक्तींना सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.

सर्वोत्तम बॅंकिंग सेवा देणे, तसेच विविध प्रकारच्या सुरक्षित सुविधांशी आपली माहिती जोडण्यास मदत व्हावी म्हणून प्रत्येक व्यक्तीला विशेष ओळख प्राप्त करून देण्याच्या सरकारच्या उपक्रमाला पाठिंबा देणे या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे. आधार कार्ड नोंदणी सेवा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)