लक्ष्मी रस्ता व कुठमेकर रस्त्यावरुन 3400 किलो प्लास्टिक जप्त

नामांकित दुकानांवर छापे: विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाकडून प्लास्टिक जप्ती
पुणे – प्लास्टिक बंदी होऊन अनेक दिवस झाले असले तरीही पुण्यातील शॉपिंग स्ट्रीट म्हणवल्या जाणाऱ्या लक्ष्मी रस्ता तसेच कुमठेकर रस्त्यावर सर्रास लग्नाचा बस्ता बांधायला आलेल्या वधु व वर पक्षांच्या नातेवाईकांच्या हातात पिशव्यांचा ढीग पहायला मिळत होता. मात्र आता विश्रामबाग वाडा क्षेत्रिय कार्यालयाकडून या अनेक नामांकित दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन दिवसांत तब्बल 3 हजार 400 किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.
लक्ष्मी रस्ता व कुमठेकर रस्त्यावर अनेक कपड्यांची तसेच खाण्यापिण्याची दुकाने आहेत. प्लास्टिक बंदी व त्यानंतर प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती होऊनही अजुनही अनेक नामांकित दुकानांकडून आम्हाला याबाबत काही माहितीच नसल्याप्रमाणे सर्रासपणे नागरिकांना मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कपडे व खाण्याचे पदार्थ विकत होते. त्यांच्यावर विश्रामबाग वाडा क्षेत्रिय कार्यालयाकडून सोमवारी कुमठेकर रस्त्यावर तर मंगळवारी लक्ष्मी रस्त्यावरील दुकांनामध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 23 एप्रिल रोजी 1 हजार 600 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर 24 एप्रिल रोजी 1 हजार 800 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई सहायक आयुक्‍त अशिष महाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुभाष तोंडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल मोहिते, रविराज बेंद्रे, अमित घाग, विनय थोपटे, संजये तेरेकर, कृष्णा अवघडे, नंदकुमार म्हागरे, किशोर थोरात आदी अधिकाऱ्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)