लक्ष्मी पूजनासाठी झेंडूची मोठी आवक

पिंपरी –लक्ष्मी पूजनासाठी फुल बाजारात झेंडूची मोठी आवक झाली असून मागणीही वाढली आहे. आवक वाढल्याने झेंडूला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली. दसऱ्यानंतर लक्ष्मी पूजनाने देखील शेतकऱ्यांची निराशा केली आहे. नगदी पीक म्हणून झेंडूकडे वर्षभर पाहिले जाते.

दसरा आणि दिवाळीतील लक्ष्मी पूजनासाठी
झेंडूची मागणी लक्षात घेता चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिंबळी, सोळू परिसरात अनेक शेतकरी झेंडूचे उत्पादन घेतात. याशिवाय पिंपरी बाजारात गुलटेकडीवरूनही फुलांची आवक होत असते. यंदा दसऱ्याला झेंडूंची मोठी आवक झाल्याने प्रती किलोचा भाव 40 ते 50 रुपयांपेक्षा अधिक मिळू शकला नाही. त्यानंतरही लक्ष्मी पूजनाला झेंडूला चांगला भाव मिळेल, या आशेवर अनेक फुल उत्पादकांनी झेंडूचे मळे राखून ठेवले होते. दोन दिवसांपासून झेंडूच्या तोडीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पिंपरी फुल बाजाराबरोबरच शहराच्या विविध भागांत झेंडूची मोठ्या प्रमाणावर विक्री होताना दिसते. दसऱ्याला फुलांना मागणी असूनही आवक जास्त झाल्याने शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. आजही झेंडूला 30-40 रुपये भाव मिळाला.

शेवंती, अष्टर वधारले
लक्ष्मी पूजनासाठी झेंडू, राजा शेवंती व अष्टरला देखील मागणी असते. फुल बाजारात राजा शेवंती व अष्टरने यंदा बाजी मारली आहे. दोनही फुलांचे प्रती किलोचा भाव 100 ते 120 रुपयावर पोचला आहे. झेंडूने दगा दिला, तरी या दोन फुलांनी शेतकऱ्यांना तारले आहे.

दसऱ्याने शेतकऱ्यांची निराशा केल्याने लक्ष्मी पूजनाला देखील त्याचा फटका बसला आहे. मात्र, राजा शेवंती आणि अष्टरला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता झेंडूची आवक कमी होण्याची शक्‍यता आहे.
गणेश आहेर. फुल विक्रेता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)