लक्ष्मी पूजनाचा सर्वोत्तम काळ सायंकाळी

पुणे – चार दिवसाच्या प्रकाश उत्सवात सर्वात महत्वाचा असणारा सण म्हणजे लक्ष्मी पूजन आज साजरा होत आहे. हे लक्ष्मीपूजन साधारणतः मुहूर्तावर करावे असे संकेत आहेत. यंदा पुजेचा सर्वोत्तम काळ हा संध्याकाळी आहे, अशी माहिती तेजस सप्तर्षी गुरुजी यांनी सांगितली.

दिवाळीच्या काळातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन, या काळात घराघरात लक्ष्मीचे पूजन केले जाते. याबाबत अधिक माहिती देताना तेजस सप्तर्षी गुरुजी म्हणाले, लक्ष्मी ही चंचल असते, तीला स्थिर करण्यासाठी आपण हे लक्ष्मीपूजन करत असतो, या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने लक्ष्मी आपल्याकडे स्थिर होते. त्यामुळे या पुजनाला महत्व आहे. आश्‍विन शुद्ध अमावस्येचेच्या मूहूर्तावर लक्ष्मी-कुबेराची पूजा करावी. यंदा सायंकाळी 7.34 मिनिटांपासून 9 वाजून 9 मिनिटांपर्यतचा काळ हा पुजेसाठी शुभ काळ आहे. त्याचबरोबर दुपारी 3 वाजून 34 मिनिटांपासून 5 वाजून 59 मिनिटांपर्यतचा काळ हा लाभ काळ आहे. शक्‍यतो सायंकाळच्या वेळातच लक्ष्मीपूजन करावे.

ते पुढे म्हणाले, अश्‍विन अमावस्येला रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. त्यामुळे ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी धर्मनिष्ठ आणि पतीव्रता स्त्रिया असतात. त्या घरात राहणे वास्तव करणे पसंत करते असे सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे लक्ष्मी पूजनाला महत्व अधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)