लक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्याना ब्लॅंकेट वाटप

मेढा : विनोददादा पार्टे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित अतुल महराज देशमुख, सौ. नीलम जवळ, विद्यार्थी. (छाया : प्रसाद शेटे)

मेढा, दि. 8 (प्रतिनिधी) – पारा घसरल्याने अवघा जिल्हा गारठला असून थंडीपासून संरक्षण व्हावे हा मुख्य उद्देश ठेवून लक्ष्मी चॅरिटेलब ट्रस्टने जावली तालुक्‍यातील विश्‍वंभरबाबा अध्यात्मिक संस्थेतील रहिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ट्रस्टचे संस्थापक विनोद पार्टे यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मेढा शहरातील विश्वंभर बाबा आध्यात्मिक केंद्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या कडाक्‍याच्या थंडीत 50 ब्लॅंकेटचे वाटप ट्रस्टमार्फत करण्यात आले. लक्ष्मी चारिटेबल ट्रस्टच्यावतीने विनोद दादा पार्टे यांच्या संकल्पनेतून, आरोग्य सभापती सौ. नीलमताई जवळ यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच या पुढेही ट्रस्टमार्फत सामजिक कार्यात अग्रेसर राहू तसेच कोणत्याही मदतीला सदैव तत्पर राहू अशी ग्वाही विनोददादा यांनी या प्रसंगी दिली. या कार्यक्रम प्रसंगी मेढा नगरपंचायत समितीच्या आरोग्य सभापती सौ. नीलमताई जवळ, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष सचिन जवळ, सचिन करंजेकर, विश्वंभरबाबा आध्यात्मिक केंद्राचे संस्थापक ह.भ.प. अतुल महराज देशमुख, सुमीत सपकाळ, अक्षय सपकाळ आदी उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)