लक्ष्मी अँक्वा वॉटर प्लॅंट सील

राजगुरुनगर- मांजरेवाडी (ता. खेड) येथील लक्ष्मी अँक्वा वॉटर प्लॅंटवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह महसूल प्रशासनाने संयुक्‍त कारवाई करुन बाटलीबंद पाणी तयार करणाऱ्या प्लॅंटला आज (गुरुवारी) सील ठोकले.
मांजरेवाडी (ता. खेड) येथे लक्ष्मी ऍक्वा या बाटलीबंद पाणी बनविणाऱ्या कंपनीमध्ये बाटलीबंद पाणी निर्मिती करताना अनेक त्रुटी असल्याची तक्रार अन्न व औषध प्रतिबंध भेसळ प्रशासनाकडे करण्यात आली होती त्यानुसार अन्न व औषध प्रतिबंध भेसळ सहाय्यक उपायुक्त ऐ. जी. भुजबळ यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र पाटील, नमुना अधिकारी आर. बी. आल्हाट, तहसीलदार अर्चना यादव यांच्या पथकाने आज दुपारच्या सुमारास ही कारवाई केली असून यापुढे उत्पादन करण्यात येऊ नये असे आदेश अधिकारी वर्गास देऊन लक्ष्मी एक्वा या कंपनीला सील ठोकण्यात आले.
खेड तालुक्‍यात यापुर्वीही बाटली बंद पाणी निर्मिती करणाऱ्या खासगी प्लॅंटवर अन्न व औषध सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. तालुक्‍यात राजगुरुनगर शहराला गेली अनेक वर्षांपासून प्रदुषित पाणी प्यावे लागत असल्यामुळे गेली दशकभरापासून शहरातील जनता आणि तालुक्‍याच्या ठिकाणी येणारे नागरिकांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत होते. यात घरगुती पाण्याचे जार विकत घेण्याचे प्रमाण मोठे आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात अनपेक्षित फोफावत जाऊन अनेकांनी पाणी शुद्धीकरणाचे छोटे प्लॅंट उभे राहिले आहेत. पाण्याच्या गोरखधंद्यामुळे खर्च कमी नफा जास्त कमवण्याची जणू स्पर्धा व्यवसायिकांनी सुरू केली आहे.

  • त्याही प्लॅंटची चौकशी करा
    अन्न व औषध भेसळ प्रतिबंध विभागाने आणि शासन नियमांचे उल्लघंन करत पायदळी तुडवल्याचे अनेक वेळासमोर आले आहे. खेड तालुक्‍यात अनेकांनी परवानगी न घेताच प्लॅंट सुरु केल्याचे उघडकीस आले आहे.तालुक्‍यात सुरु असलेल्या पाणी शुद्धीकरण प्रक्रीया उद्योगाची वेगवेगळ्या नावाने पाण्याचे जार, बाटली बंद व्यवसायाची माहिती जाहिर करुन सर्व प्लॅंटची चौकशी करुन लोकांच्या जीवनाशी खेळ करुन पाण्याच्या नावाखाली जादा नफ्याच्या लालसा ठेवणाऱ्यावर कडक कारवाईचे नारिकांनी स्वागत केले आहे.
  • लक्ष्मी एक्वा कंपनीत बाटली बंद पाणी निर्मिती करताना शासनाच्या एफडीऐ विभागाने तयार केलेल्या सूची व नियमानुसार कोणत्याही अटी न पाळता अनाधिकृतपणे शुद्ध पाण्याचा प्लॅंट कार्यान्वित केला होता. यामध्ये बाटली बुच पॅंकिंग, एफएसआय परवानगी नसताना बाटलीवर छापले जाणारे उत्पादन, उत्पादनाबाबत माहिती न छापता बाटलीबंद पाण्याची विक्री केली जात होती. याबरोबरच बाटलीबंद पाणी निमिर्ती करणाऱ्या ठिकाणच्या फरशा फुटलेल्या, कामगारांचे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र आढळून न आल्याने कंपनी सील केली आहे.
    – अर्चना यादव, तहसीलदार, खेड तालुका
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)