लक्षवेधी: निवडणुकीतील महिलांचे प्रमाण

दत्तात्रय आंबुलकर

विविध राजकीय पक्षांनी महिलांना दिलेल्या उमेदवारीचे प्रमाण व टक्‍केवारी पाहता 1952 मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून महिलांना उमेदवारी देण्यापासून त्यांना निवडून आणण्याच्या टक्‍केवारी आणि संख्या यामध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही.

लोकसभा निवडणुकांच्या संदर्भातील उपलब्ध तपशील व आकडेवारीनुसार 1952 च्या पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभेतील एकूण खासदारांची संख्या 499 तर महिला खासदारांची संख्या केवळ 22 होती. 1956 मध्ये 500 खासदारांमध्ये 26 महिला, 1962 च्या तिसऱ्या लोकसभेत 503 मध्ये 34 महिला, 1967 च्या चौथ्या लोकसभेत 523 मध्ये 31 महिला खासदार, 1971 च्या पाचव्या लोकसभेत 525 पैकी 22 महिला खासदार, सहाव्या लोकसभेत 544 मध्ये 19 महिला खासदार, दहाव्या लोकसभेत 39 महिला खासदार, 1966 च्या अकराव्या लोकसभेत 40 महिला खासदार तर 1998 च्या बाराव्या लोकसभेत 543 सदस्यांमध्ये 43 महिला खासदार याप्रमाणे संसदेतील प्रमाण राहिले असून ते चिंताजनक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिला खासदारांची संख्या आणि सांसदीय नेतृत्व या विषयावर दिल्ली विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या वुमेन स्टडीज अँड डेव्हलपमेंट सेटर तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 78 महिला राजकारणी पुढाऱ्यांची चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर 56 तर प्रादेशिक वा राज्य स्तरावरील 14 महिला पुढारी – खासदारांचा समोवश होता.

सर्वेक्षणा दरम्यान त्यांना निवडणूक व राजकीय क्षेत्रात महिलांची संख्या व प्रमाणे कमी होण्याचे कारण काय असा प्रश्‍न विचारण्यात आला. यामधील उत्तरात सर्वाधिक म्हणजेच 38 महिलांनी लिंगभेद हे कारण सांगितले तर 18 महिलांनी पुरुष-महिलां दरम्यान सर्व साधारणपणे सर्वच क्षेत्रात करण्यात येणारा भेदभाव याप्रमाणे कारणे स्पष्ट केली होती. विशेष बाब म्हणजेच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 39 महिलांनी त्यांना लोकसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी राखीव जागा ठेवण्याची भलावण केली होती.

विविध राजकीय पक्षांतर्फे महिला कार्यकर्त्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत तिकीट देतांना त्यांच्या पत्नी वा अन्य नातेवाईकांचे निधन झाल्यानंतरच व केवळ सहानुभूतीपोटी त्यांना उमेदवारी दिली जाते, हा पैलू पण सर्वेक्षणाच्या दरम्यान प्रामुक्‍याने प्रकाशात आला.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संसदेतील संख्या कमी असली तरी आपल्याकडील काही महिला खासदारांनी आपापल्या क्षेत्रात कार्य-कर्तृत्वाची कायमस्वरूपी छाप पाडली आहे. यामध्ये प्रामुख्याने इंदिरा गांधी, विजयाराजे शिंदे, उमा भारती, सुमित्रा महाजन, मीरा कुमार, मृणाल गोरे, जयवंतीबेन मेहता, अहिल्या रांगणेकर, सुषमा स्वराज, सोनिया गांधी, गिरीजा व्यास, ममता बॅंनर्जी इ. वेगवेगळ्या पिढीतील महिला खासदारांचा कार्यगौरव करावा लागेल. संख्येने कमी असल्या तरी पुरुष खासदारांपेक्षा महिला सदस्य अधिक प्रभावी ठरू शकतात, हा गुणात्मक फरक अर्थातच महत्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)