लक्झुरियस घर खरेदी करताना…. (भाग-१)

File photo

आलिशान घराची देखभाल करण्याची क्षमता राखणारेच खरेदीचा विचार करू शकतात. मात्र प्रतिष्ठा, सन्मानाव्यतिरिक्त आलिशान घरे ही गुंतवणुकीचा उत्तम पर्याय देखील सिद्ध होऊ शकतो. क्रिस्टिज इंटरनॅशनल रिअल इस्टेटनने आपल्या 2014 च्या एका अहवालात आलिशान घराची परिभाषा स्पष्ट केली आहे. आलिशान घर म्हणजे त्याची किंमत दहा लाख डॉलर किंवा 6 कोटी 4 लाखाच्या वर असते

उच्चभ्रू सोसायटीतील मालमत्तेचे मूल्य कधीही कमी होत नाही. दीर्घकाळाचा विचार करता त्या मालमत्तेच्या किंमतीत सतत वाढ होत राहते. एखादे आलिशान घर हे अनेकांच्या यशाचे प्रतिक असते. त्याची संपदा ही प्रभाव आणि प्रतिष्ठेचे दर्शन घडवण्याचे माध्यम बनते. आलिशान घराची देखभाल करण्याची क्षमता राखणारेच खरेदीचा विचार करू शकतात. मात्र प्रतिष्ठा, सन्मानाव्यतिरिक्त आलिशान घरे ही गुंतवणुकीचा उत्तम पर्याय देखील सिद्ध होऊ शकतो. अशा घरात नफा वाढण्याची शक्‍यता अधिक बळावते. परदेशात न्यूयॉर्क, लंडनसारख्या शहरात आलिशान घरातील किंमती 10 ते 20 कोटीपेक्षा अधिक असतात. तर आपल्याकडे मुंबई, दिल्ली, बंगळूरसारख्या शहरात आलिशान घराच्या किंमती तीन ते पाच कोटी दरम्यान आहेत. उद्योगपती, व्यावसायिक, वडिलोपार्जित गर्भश्रीमंत मंडळीच अशा प्रकारच्या घराची खरेदी करू शकतात. आलिशान घराचे फायदे अनेक असले तरी त्यापासून होणाऱ्या तोट्यांकडेही दुर्लक्ष करू नये.

लक्झुरियस घर खरेदी करताना…. (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आलिशान घराची संकल्पना
सर्वात अगोदर आलिशान किंवा लक्‍झरी होम म्हणजे काय याची संकल्पना जाणून घ्यावी लागेल. क्रिस्टिज इंटरनॅशनल रिअल इस्टेटनने आपल्या 2014 च्या एका अहवालात आलिशान घराची परिभाषा स्पष्ट केली आहे. आलिशान घर म्हणजे त्याची किंमत दहा लाख डॉलर किंवा 6 कोटी 4 लाखाच्या वर असते, त्याला आलिशान घर, फ्लॅट, बंगला असे म्हणतो. अर्थात लोकेशनच्या हिशोबाने मालमत्तेचे मूल्य वेगवेगळे असू शकते. एक अल्ट्रा हायनेटवर्थ (उच्च श्रेणीतील उत्पन्न) असणाऱ्या व्यक्तीचे लंडनमध्ये 2 कोटी डॉलरचे घर आलिशान श्रेणीत मोडते. तसेच एखाद्या आंतरराष्ट्रीय बॅंकेच्या मॅनेजिंग डायरेक्‍टरसाठी हॉंगकॉंगमध्ये 30 लाख डॉलरचे पेंटहाऊस देखील आलिशान घर असू शकते.

– कमलेश गिरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)