लक्झुरियस घर खरेदी करताना…. (भाग-२)

File photo

आलिशान घराची देखभाल करण्याची क्षमता राखणारेच खरेदीचा विचार करू शकतात. मात्र प्रतिष्ठा, सन्मानाव्यतिरिक्त आलिशान घरे ही गुंतवणुकीचा उत्तम पर्याय देखील सिद्ध होऊ शकतो. क्रिस्टिज इंटरनॅशनल रिअल इस्टेटनने आपल्या 2014 च्या एका अहवालात आलिशान घराची परिभाषा स्पष्ट केली आहे. आलिशान घर म्हणजे त्याची किंमत दहा लाख डॉलर किंवा 6 कोटी 4 लाखाच्या वर असते

लक्झुरियस घर खरेदी करताना…. (भाग-१)

आलिशान घराच्या खरेदीचे फायदे
जादा कमाई करणाऱ्या व्यक्तीचे लंडनमध्ये खरेदी केलेली इस्टेट एक उत्तम लाभदायक गुंतवणूक मानली जाते. ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केलेली असू शकते. तसेच पुढच्या पिढ्या देखील त्याठिकाणी राहू शकतील, असा विचारही खरेदी करताना केलेला असू शकतो. साधारणपणे आलिशान घराची खरेदी ही कमी काळात जादा फायदा घेण्याच्या दृष्टीने केली जात नाही. ही मालमत्ता कायमस्वरूपी ठेवण्याच्या दृष्टीनेही खरेदी केलेली असू शकते. ही मालमत्ता दीर्घकाळासाठी आपले मूल्य राखू शकते आणि कालांतराने त्यात कैकपटीने वाढ होईल, अशी अपेक्षा गृहित धरली जाते. विशेषत: न्यूयॉर्क किंवा लंडनमध्ये जर मालमत्ता असेल तर तो हाच दृष्टिकोन समोर ठेऊन मालमत्ता खरेदी केलेला असू शकतो. चांगल्या ठिकाणी मालमत्तेचे प्रमाण कमी असल्याने त्या ठिकाणी मूल्य वाढण्याची शक्‍यता अधिक असते. अशा गुंतवणुकीत बॉंड किंवा शेअरसारख्या अन्य गुंतवणुकीच्या तुलनेत जादा परतावा मिळतो. मूल्य वाढ अधिक आणि स्थिर राहण्याची शक्‍यता अधिक असते. त्याचबरोबर संपत्तीवृद्धीसाठीदेखील आलिशान घरासारख्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आलिशान घराच्या खरेदीने नुकसानीचे प्रमाण
आलिशान घर खरेदीतील किंवा गुंतवणुकीतील उणिवा पाहायचे झाल्यास हॉंगकॉंग शहराचे उदाहरण घेता येईल. हॉंगकॉंगसारख्या महागड्या शहरात किमतीत प्रचंड वाढ होत असतानाही न्यूयॉर्क किंवा लंडन शहराप्रमाणे फायदे गुंतवणूकदाराला मिळत नाहीत. दुसरे म्हणजे कमी कालावधीसाठी घर खरेदी करण्याचा असेल तर त्याला क्वालालंपूर, मनीला किंवा दक्षिण आशियायी शहरातील व्यावसायिक मालमत्तेवर आपले लक्ष केंद्रीत करायला हवे. ज्या ठिकाणी तो कार्यालयाच्या रूपाने मालमत्ता भाड्यावर देऊन नियमितपणे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहू शकतो. शेवटी आलिशान घराची खरेदी करताना गरज, गुंतवणुकीची क्षमता, लोकेशन या गोष्टीचे आकलन करणे गरजेचे आहे. आपली आवडनिवड देखील पाहणे महत्त्वाचे ठरते. प्रत्येक गुंतवणुकीतील उणिवा देखील पाहणे गरजेचे असून त्यावर विश्‍लेषणही करायला हवे.

– कमलेश गिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)