लकी-खली पंजाब संघ सेवागिरी चषकाचा मानकरी

व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात

पुसेगाव – श्रीसेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजीत अखिल भारतीय शुटींगबॉल स्पर्धेतील रंगतदार व चुरशीच्या अंतिम सामन्यात लकी-खली पंजाब संघाने उत्तरप्रदेशच्या अरुण शर्मा व्हॉलिबॉल संघाचा पराभव करुन श्रीसेवागिरी करंडक व प्रथम क्रमांकाचे पंचवीस हजारांचे बक्षीस पटकावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीसेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगावात राज्यस्तरीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत 20 संघांनी भाग घेतला. उपउपान्त्य व उपांत्य फेरीतील सर्वच सामने रंगतदार झाले. अंतिम सामन्यात दिल्लीचा लकी व प्रतिस्पर्धी उत्तरप्रदेशच्या अरुण शर्माच्या आक्रमक खेळात चुरस निर्माण झाली. उपविजेत्या संघाला पंधरा हजारांचे बक्षिस मिळाले. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत एम्स दिल्ली व्हॉलिबॉल संघाला तिसरा क्रमांक (दहा हजार) आयसीसी मालेगाव संघाने चौथा (पाच हजार), इस्तियाक मालेगाव संघाने पाचवा, सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघाने सहावा, सोलापूर जिल्हा संघाने सातवा तर सुरेशकुमारच्या हरियाणा संघाला आठवा क्रमांक मिळाला.

उत्तरप्रदेश संघातील अरुणकुमार व निट्टू, पंजाब संघातील लकी व खली, दिल्लीचा मित्तल व हरियाणाचा सुरेशकुमार या राष्ट्रीय खेळाडूंच्या आक्रमक खेळाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अरविंद पाटील, सुरेश पाटील, जावेद मनोरे व विजय कोकीळ (सातारा) यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजय जाधव, भरत जाधव, जे. टी. जाधव, विजयसिंह जाधव, अशोक जाधव, मंगेश जाधव, उत्तम सावंत, सुनिल जाधव, निखिल जाधव, प्रा. शंकर शेडगे, मयुर हिंगमिरे,मयुर विधाते, सचिन जाधव, राजू तारळकर यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

प्रारंभी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. विश्‍वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, विश्‍वनाथ जाधव, प्राचार्य डी. पी. शिंदे, श्रीधर जाधव, सचिन जाधव, प्रतिक जाधव, अभिषेक पाटोळे, करण आवळे, दीपक जाधव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)