लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक-समर्थकात चकमक

लंडन : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक व समर्थक यांच्यात राडा झाला. विरोधकांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान भारताचा ध्वज फाडून पायदळी तुडवण्यात आला. दोन्ही बाजूंनी अवमानकारक घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, संयुक्त राष्ट्रात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संयुक्त राष्ट्राच्या पाच कायम सदस्यांपैकी रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन यांचे राजदूत कार्यक्रमाला उपस्थित होते. पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी समारंभाला उपस्थित राहून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वॉशिंटन येथील भारतीय दूतावासात अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेजसिंग सरना यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दर प्रजासत्ताक दिनी भारतविरोधी गट लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर दरवर्षी निदर्शने करतो. हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो. ब्रिटिश संसदेचा असंलग्न सदस्य लॉर्ड नजीर अहमद याने यंदाही असेच आंदोलन आयोजित केले होते. त्यावेळी भारतीय ध्वजाची विटंबणा करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)