र्औद्योगिक उत्पादन घटल्याने चिदंबरम यांनी सरकारला घेरले

नवी दिल्ली – देशातील औद्योंगिक उत्पादन घटल्याच्या वृत्ताने ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टिका करण्याची संधी घेतली आहे. केवळ औद्योगिक उत्पादनच घटले आहे असे नव्हे तर किरकोळ वस्तुंच्या महागाईनेही कळस गाठला असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. महागाईचा हा दर गेल्या पाच महिन्यातील उच्चांकी पातळीवर गेला आहे.

मे महिन्यातील आकडेवारीनुसार ओैद्योगिक उत्पादनाचा दर 3.2 टक्‍के इतका घसरला असून गेल्या सात महिन्यातील तो एक नीचांक आहे.अशा सगळ्या वातावरणात लवकरच अच्छे दिन येतील असा टोमणाही चिदंबरम यांनी मारला आहे.

सरकारच्या मावळत्या आर्थिक सल्लगारानेही नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात मंदीचे वातावरण निर्माण झाल्याचे मान्य केले होते हेही चिदंबरम यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी दीड टक्‍क्‍यांनी कमी होईल असे भाकित आम्ही केले होते ते खरे ठरले आहे असेहीं त्यांनी नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)