आनंद मेडिकल फाऊंडेशनकडून सामाजिकतेचा जागर

चिंबळी- आनंद मेडिकल फाऊंडेशन संचलित आनंद इंग्लिश मीडियम स्कूल (कुरुळी) च्या वतीने ठाकूर पिंपरी, राजगुरूनगर येथील निर्मल बाल विकास संस्था अनाथाश्रमला भेट देऊन दिवाळीचे फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ अनिल काळे, संस्थेच्या सचिव अनघा काळे, स्कूलच्या मुख्याध्यापिका सरला रेवगडे (सोनवणे), नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या प्रिंसिपल लुशा, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सारिका आनंद गवारे, स्नेहल बागडे, माया मुऱ्हे, रंजिता मुऱ्हे, ज्योती मुऱ्हे, अनिता कड, हेमलता कड, शालेय समितीचे उपाध्यक्ष प्रकाश मुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व महिलांनी स्वतः फराळ बनवून आणले. त्याचे वाटप केले.डॉ. अनिल काळे यांनी आश्रमाच्या प्रमुख गीताताई यांच्यासोबत चर्चा करून समस्या समजून घेतल्या. आश्रमाचे वीजबिल थकल्यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यानंतर डॉ. काळे यांनी त्वरित 5 हजार 551 रुपयांचा धनादेश गीता ताई यांना सुपूर्द केला. मुलांची विनामूल्य तपासणी करण्याचे आश्‍वासन दिले. शाळेने यंदाची दिवाळी अनाथ मुलांसोबत साजरी करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)