रोहित शेट्टी साकारणार शिवछत्रपतींच्या जीवनावर चित्रपट?

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक असा अनेक बायोपिक चित्रपटांची घोषणा होत आहे. यातील काही प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत तर काहींचे चित्रीकरण सुरू आहे. या बायोपिकमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसत आहेत.

बायोपिकबद्दल बॉलिवूडमधील अनेक धमाकेदार चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीला विचारले असता, मी याबद्दल सध्या काहीही विचार केला नसल्याचे त्याने म्हटले. पण असा काही विचार केला तर शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट बनवायला मला आवडेल, असे रोहितने म्हटले आहे. कारण, त्यांच्याशी संबंधीत इतिहासाबद्दलची मला भरपूर माहिती असल्याचे त्याने सांगितले. पण या चित्रपटासाठीचा खर्च अधिक असल्याने अजून भरपूर वेळ चित्रपटासाठी असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

-Ads-

शिवाजी महाराजांची भूमिका या चित्रपटात अजय देवगण साकारणार का? असा प्रश्न केला असता. रोहितने म्हटले आत्ताच याबद्दल मी काहीच बोलणार नाही. कारण मी जर हो म्हटलो तर उद्याच माध्यामांमधून बातम्या येतील की, तानाजी पाठोपाठ आता शिवाजीमध्येही अजय झळकणार.

दरम्यान, रोहित शेट्टी दिग्दर्शित “सिम्बा’ चित्रपट येत्या 28 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)