रोहित शर्मा आणि शिखरने मोडला सचिन-सेहवागचा विक्रम !

File photo

मुंबई: रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एकदिवसीय विश्‍वात भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीरांच्या यादीत रोहित आणि शिखर ही सलामी जोडी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर, जागतिक स्तरावर त्यांनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. रोहित आणि शिखर जोडीने आज मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या सलामी जोडीचा विक्रम मोडीस काढला. सचिन आणि सेहवाग जोडीने 2002 ते 2012 या कालावधीत 93 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42.13 च्या सरासरीने सलामी करताना 3919 धावा केल्या होत्या. यात 12 शतकी आणि 18 अर्धशतकी भागीदाऱ्यांचा समावेश आहे. रोहित-शिखर जोडीने अवघ्या 87 इनिंगमध्ये 3920 धावा करून सचिन-सेहवागला मागे टाकले आणि दुसरे स्थान प्राप्त केले. तर सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही जोडी 6609 धावांसह अव्वल स्थानावर आहे.

रोहितने मोडला सचिनचा विक्रम

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विंडीजविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आक्रमक शतकी खेळीची नोंद केली. रोहितने विंडीजच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत 137 चेंडूमध्ये 162 धावांची खेळी केली. रोहितच्या या खेळीत 20 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. दरम्यान आजच्या खेळीत रोहित शर्माने सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला आणखी एक विक्रम मोडला आहे.

भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. रोहितने आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा 195 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. रोहितने 186 डावांमध्ये 196 षटकार ठोकले आहेत. या यादीमध्ये महेंद्रसिंह धोनी 218 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे.

रोहित शर्मानं केलेल्या सात दीड शतकी खेळी पुढीलप्रमाणे:

1. 209 नोव्हेंबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरूमध्ये.
2. 264 नोव्हेंबर 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकातामध्ये.
3. 150 ऑक्‍टोबर 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरोधात कानपूरमध्ये.
4. 171 जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात पर्थमध्ये.
5. 208 डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकेविरोधात मोहालीमध्ये.
6. 152 ऑक्‍टोबर 2018 मध्ये वेस्टइंडिजविरोधात गुवाहाटीमध्ये.
7. 162 ऑक्‍टोबर 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात मुंबईमध्ये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)